सावद्यातील ४ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह व १३ निगेटिव्ह !
सावदा (प्रतिनिधी)। शहरातील आलेल्या कोरोना तपासणी अहवालात सावदा येथील संशयित रूग्णांचे स्वॅब काही तपासणीसाठी घेण्यात आले होते. सदरील ४ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरील ४ अहवालांमध्ये ३ पुरुष १ महिलेचा समावेश असून त्यात सावदा येथील रावसाहेब प्रेमचंद नगर मधील रहिवासी असलेले पण खिर्डी येथे घेतलेल्या कॅम्प मध्ये बाधित आढळून आलेले ५० वर्षीय अधिवक्ता व दोन रुग्ण ३७ वर्षीय परुष, ५५ वर्षीय महिला शनी मंदिर रोड परिसरातील तर एक तरुण सोमवारगिरी मढी स्वामीनारायण मंदिर परिसरातील २५ वर्षीय तरुण बाधित आढळून आला आहे. यांच्या संपर्कातील १३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सदरील वृत्तास डॉ. चंदन पाटील व सावदा नगरपालिका प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या १०२ झाली असुन त्यात १० मयत, १३ उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला मात देत घरी परतले आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे