भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्याराष्ट्रीय

सावधान:मोफत वायफायच्या नादात बँक अकाऊंट्स होतायत हॅक, आख्खा बॅलन्स सफाचट!

डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षेस ग्राहकांनी सर्वाधिक प्राधान्य द्यायला पाहिजे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सार्वजनिक, खुले किंवा मोफत वायफाय नेटवर्कद्वारे बँकिंग किंवा इतर आर्थिक व्यवहार टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारांचा सुरक्षितपणे वापर करावा यासाठी ग्राहकांना सतर्क केले आहे. मोफत वाय-फाय प्रकरणात मोठ्या संख्येने ग्राहकांची बँक अकाऊंट्स हॅक केली जात आहेत. यासंदर्भात १७० ग्राहकांनीही विविध बँकांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत.

सतर्क होण्यासाठी RBI ची ‘आरबीआय कहता है’ मोहीम

रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षेस ग्राहकांनी सर्वाधिक प्राधान्य द्यायला पाहिजे. यासंदर्भात सतर्क होण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ‘आरबीआय कहता है’ अशी मोहीमही सुरू केली आहे. ग्राहकांना मोहात पाडण्यासाठी,  या ओपन वाय-फायमधून मिळणारा सर्वाधिक नेट स्पीड फसवणूक करू शकतात. ग्राहकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेकदा मोठ्या सवलतीच्या फ्लॅश ऑफर देखील सुरू केल्या जातात, नकळत ग्राहक याला बळी पडतात आणि मोफत वायफायच्या नादात बँक अकाऊंट्स हॅक केली जातात.

फसवणूक होत असलेल्या घटनांमध्ये भर

मुख्य महाव्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार, अलीकडच्या काळात फसवणूक करणार्‍यांनी केवायसीची आवश्यकता पूर्ण करणे इत्यादी बनावट सबबीवरून आणि बँकेची हुबेहुब वेबसाइट बनवून फसवणूक केल्याच्या घटनांमध्ये भर पडली आहे. मोबाइल, ईमेल, इलेक्ट्रॉनिक वॉलेटवर महत्त्वाचा बँकिंग डेटा ठेवू नका, असे ग्राहकांना सांगण्यात आले आहे. तसेच ओटीपी, पिन किंवा सीव्हीव्ही क्रमांक कोणालाही चुकून उघड करू नका.

…तर तुम्ही बळी ठरू शकाल

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सायबर हल्ल्यांविषयी इशारा दिला आहे. एसबीआयने म्हटले आहे की, कोविड -१९ चाचणीच्या नावावर काही ईमेल आले तर त्यावर क्लिक करू नका, अन्यथा तुम्ही सायबर हल्ल्याचे बळी ठरू शकाल. तसेच एसबीआयने ग्राहकांना असेही सांगितले की, कोविड १९ च्या नावावर बनावट ईमेल पाठवून लोकांकडून त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरून घेत आहेत. हे हॅकर्स बँक तपशील घेत आहेत आणि आपले खाते हॅक करत आहेत. संशयास्पद ईमेल आयडी ncov2019@gov.in आहे. ईमेलची विषय रेखा विनामूल्य कोविड -१९ चाचणी असे असल्याचेही सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!