सिव्हिल सोसायटीचे, मुक्ताई मंदिर स्वछता अभियान
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। कोरोनामुळे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून मुक्ताईनगर सिव्हील सोसायटीचे ,बंद पडलेले “मुक्ताई मंदिर स्वच्छता अभियान” आजपासून सुरू झाले
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर सिव्हील सोसायटी गेल्या तीन वर्षापासून एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जुने मुक्ताबाई मंदिर कोथळी येथे स्वच्छता अभियान राबवत आहे पण कोरोना काळामुळे आठ ते दहा महिन्यापासून हे स्वच्छता अभियान बंद होते जे आजपासून सुरू झाले सिव्हिल सोसायटीमध्ये मुक्ताईनगर शहरातील बरेच प्रतिष्ठित डॉक्टर्स व्यापारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत जे आपल्या पैशाचा कसलाही गर्व न करता पूर्ण मनापासून हे काम करत आहेत तसेच सिव्हील सोसायटी मार्फत इतर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम मुक्ताईनगर मध्ये राबविले जातात
जसे की गणपती विसर्जनावेळी निर्माल्य नदीत टाकून प्रदूषण होते ते होऊ नये यासाठी निर्माल्य संकलन केंद्र उभारणी, शहरात कचरा होऊ नये म्हणून डस्टबिन चे वाटप करणे, भुकेल्या तहानलेल्या साठी अन्ना पाण्याची व्यवस्था करणे, ज्यांच्याकडे कपडे नाही त्यांच्यासाठी कपडा बँक ची उभारणी तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील पाण्याची भीषण टंचाई असलेल्या रुईखेडा गावात डोंगरावर चाऱ्या खोदून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरुन पाण्याची पातळी वाढेल यासाठी सिव्हील सोसायटी मार्फत नाला खोलीकरण व इतर अनेक कार्यक्रम रुईखेडा गावात राबविण्यात आले तसेच वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम मुक्ताईनगर सिव्हील सोसायटी मार्फत मुक्ताईनगर शहरात राबवले जात आहेत.