“हळद रुसली,कुंकू पुसलं.कोरोनाने संपूर्ण जीवनच रुसलं”एकाच कुटुंबातील तीन तरुण महिला विधवा..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
अमळनेर (विशेष प्रतिनिधी)। कोरोना मुळे अनेकांचे संसार उद्वस्त होत आहे त्यात जळगाव जिह्यातील अमळनेर तालुका हा अग्रेसर आहे अमळनेर तालुक्यात मृत्यूचे प्रमाण वाढले असून पाठोपाठच्या मृत्यूने तालुका हादरला आहे,अमळनेर तालुक्यातील दोधवद ,येथे पिता पुत्रासह जावयाचा कोराना ने बळी घेतला आहे. एकाच कुटुंबातील तिन्ही कर्ते पुरुष गेल्याने कुटुंबासमोर दुःखाचा डोंगर उभा राहिला आहे. एकाच किटुंबतील तीन महिला अचानक विधवा झाल्या,अशा हृदय कारक परिस्थिती ग्रामस्थांनी एकजुटीने या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मदतीचा हात दिला आहे.
अमळनेर तालुक्यातील दोधवद येथील नामदेव वामन पाटील हे आपल्या पत्नी, एक मुलगा, दोन मुलीसह सून, जावई व नातवंडेसह राहत होते. मुलीचे लग्न झाल्यानंतर ते आपल्या सासरी नांदत होत्या. मात्र एका नंतर एका घटनेने या कुटुंबाची पूर्णपणे वाताहत झाली. सुरुवातीला जावई सुपडू भदाणे रा.बोरकुंड ता.जि. धुळे,यांचे निधन झालं अन मोठी मुलगी मिनाबाई हिचे कुंकू पुसलं गेलं. कमी वयातच मुलीच्या जीवनात वैधत्व आले. दोन वर्षांपूर्वी नामदेव पाटील यांच्या पत्नी पुष्पबाई पाटील ,वय-60 यांनी आजारपणातच या जगाचा निरोप घेतला. दुःखातून हे कुटुंब सावरत नाही तो पर्यंत कोरोना च्या दुसऱ्या लाटेने होत्याचे नव्हते केले. त्यांचे लहान जावई व धुळे जय हिंद महाविद्यालयाचे कर्मचारी विलास सुधाकर पवार रा.न्याहलोद ता.जि. धुळे,यांचे 15 दिवसांपूर्वी कोरोना ने निधन झाले अन पुन्हा एकदा दुसरी मुलगी विद्याबाई हिचे कुंकू पुसलं गेलं. असा दुःखाचा डोंगर कोसळला असतांनाच नामदेव पाटील व प्रशांत नामदेव पाटील या दोघे पिता- पुत्र यांना देखील कोरोणा ची लागण झाली.
त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची गेल्या आठ-दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू होती. परंतु नियतीने पुन्हा एकदा घात केला. अन गेल्या मंगळवारी नामदेव पाटील वय- 65 यांचे तर बुधवारी प्रशांत नामदेव पाटील,वय-42 या पिता पुत्रांचा पाठोपाठ दुर्दैवी मृत्यू झाला. अगोदरच दोन्ही मुली कमी वयात विधवा झाल्या अन त्यात भर पडत सुनेचे ही कुंकू गेल्याने ती पण कमी वयात विधवा झाली.दुर्दैवी काळांन त्याच्यावर शेवटी ही वेळ आणल्यानं असच म्हणावं लागेल , ” हळद रुसली, कुंकू पुसलं.कोरोनाने संपूर्ण जीवनच रुसलं “