हिंगोणा येथे विलगी करण कक्षाची स्थापना !
हिंगोणा ता.यावल(प्रतिनिधी): यावल रावेर तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रादुर्भाव बघता इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी डॉ अजीत थोरबोले यांच्या सुचने व पत्राद्वारे प्रा.आ.केंद्र स्तरावर विलगीकरण कक्ष निर्मिती करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार प्रा.आ.केंद्र हिंगोणा अंतर्गत, गावातील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा हिंगोणा ग्रामपंचायत जवळ येथे हाय रिस्क कॉन्टैक्ट असलेल्या व्यक्तींकरीता विलगिकरण कक्ष स्थापन करण्याकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ.फीरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर यांनी ग्रामपंचायत चे संरपंच श्री.महेश राणे, ग्राम विकास अधिकारी देवानंद सोनवणे, तलाठी दिपक गवई, यांच्या समवेत पहाणी केली. व विलगीकरण कक्षाच्या निर्मितीकरीता आवश्यक त्या उपायोजना सुचविल्या. शाळेत किंवा शाळेशेजारील परिसरात कोणी रिकामे फिरत किंवा रिकामे बसलेले आढळल्यास त्यांच्यावर 500 रु दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अश्या सूचना देण्यात आल्या.