हिंगोण्यात पुन्हा कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ
हिंगोणा ता.यावल(प्रतिनिधी)। गावात एक महिन्यापूर्वी कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती परंतु सदर रुग्ण काही दिवसापूर्वी कोरोनावर मात करून घरी परतला होता त्यावर हिंगोणा येथील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला होता परंतु आज पुन्हा गावात रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे काही दिवसापूर्वी गावातील कुटुंब लग्नसमारंभासाठी बाहेर गावाला गेले होते तेथील एक जण कोरोना पॉझिटिव आढळून आल्याने गावातील सात जणांना फैजपुर येथील कोवीड सेंटरमध्ये क्वॉरन टाईन करण्यात आले होते त्यांचे स्वॅब घेतले असता त्यातील एक 45 वर्षीय इसम पॉझिटिव्ह आढळून आलेला असल्याने सदर परिसर ग्रामपंचायत मार्फत सील करण्यात आला असुन आरोग्य विभागा मार्फत परीसरातील ग्रामस्थाची थर्मामीटर व ऑस्कीमीटर द्वारे आरोग्य सेवीका सौ ज्योती भवरे व आशा वर्कर आशा तडवी करत आहेत
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.