भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयक्राईमताज्या बातम्याराष्ट्रीय

२१ जून रोजी मोठा सायबर अटॅक, ६ देश निशाण्यावर

जगभरात करोना व्हायरस आल्यानंतर या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व देश प्रयत्नशील असताना काही हॅकर्स मात्र याचा गैरफायदा घेताना दिसत आहे. एका नव्या रिपोर्ट्समधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उद्या २१ जून रोजी एक मोठा सायबर हल्ला होऊ शकतो. जगभरातील एकूण सहा देशात हा हल्ला होण्याची भीती वर्तवली आहे.

नवी दिल्ली।

गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ सायबर अटॅकच्या बातम्या येत आहेत. करोना व्हायरस महामारी नंतर सायबर अटॅकमध्ये वाढ झाली आहे. आता एका नवीन रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, भारताचा या सहा देशात समावेश करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी २१ जून रोजी म्हणजेच उद्या एक मोठा सायबर हल्ला होऊ शकतो. नॉर्थ कोरियाचे हॅकर्स कोविड – १९ थीमला शस्त्र बनवून फिशिंग कँपने हल्ला करू शकतात. ZDNet च्या शुक्रवारी पब्लिश झालेल्या एका रिपोर्टनुसार, Lazarus Group कडून एक मोठा हल्ला केला जावू शकतो. या अटॅकमध्ये ५० लाखांहून अधिक लोक आणि कंपन्या निशाण्यावर आहेत. यात छोटे आणि मोठे व्यापारी यांचा समावेश आहे. भारत, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, अमेरिका आणि ब्रिटन या देशात हा हल्ला होऊ शकतो.

६ देशांवर होऊ शकतो हल्ला

सिंगापूरच्या मुख्यालयातील सायबर सिक्योरिटी कंपनी Cyfirma च्या माहितीनुसार, नॉर्थ कोरियाई हॅकर ग्रुप या अटॅकच्या माध्यमातून पैसा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. या अटॅकमध्ये टारगेटेड ईमेल युजर्सकडून काही फ्रॉड वेबसाईटवर जाण्यास सांगितले जावू शकते. तसेच आपली खासगी आणि आर्थिक संदर्भातील माहिती मागवून फसवले जाऊ शकते.

Lazarus हॅकर्सचा दावा आहे की, त्यांच्याजवळ जपानमध्ये ११ लाख युजर्स, भारतात २० लाख युजर्स आणि ब्रिटनमध्ये १,८०,००० कंपन्यांचे ईमेल डिटेल्स आहेत. रिपोर्टनुसार, अटॅकमध्ये सिंगापूरच्या बिझनेसच्या ८ हजार संस्था निशाण्यावर आहेत. तर बिझनेस कॉन्टॅक्ट्स मधील एक ईमेल टेंपलेट मध्ये सिंगापूर बिझनेस फेडरेशन (SBF) च्या सदस्यांचे नाव आहे.

सरकारला दिली गेली माहिती

Cyfirma चे संस्थापक आणि सीईओ कुमार रितेश यांच्या माहितीनुसार, त्यांनी सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, भारत आणि अमेरिकामधील सरकारी CERTs (कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम) ला नोटिफाय करण्यात आले आहे. तसेच ब्रिटनमध्ये सुद्धा नॅशनल सायबर सिक्योरिटी सेंटरला माहिती देण्यात आली आहे. सर्व सहा एजन्सीने अलर्ट जारी केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

रितेश यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यात आम्ही कोविड १९ महामारी संदर्भातील जोडलेल्या हॅकर्सच्या अॅक्टिविटीजला सुद्धा मॉनिटर केले आहे. विशेष म्हणजे, हॉक्स, फिशिंग आणि स्कॅम कॅम्पेनला केले आहे. Lazarus ग्रुपला नॉर्थ कोरियाच्या इंटेलिजन्स ब्यूरो Reconnaissance General Burea कडून कंट्रोल केले जाते. २०१४ मध्ये सोनी पिक्चर्स इंटरटेनमेंट आणि २०१७ मध्ये अमेरिका आणि ब्रिटन सह अनेक देशात झालेल्या WannaCry रॅनसमवेयर अटॅक साठी याच ग्रुपला जबाबदार ठरवले गेले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!