भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

२१ लाखाचा जप्त वाळू साठा चोरीला..? गौडबंगाल काय…? चौकशीची मागणी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर (प्रतिनिधी)। २१ लाख रुपये मूल्य असलेला ५०० ब्रास वाळू साठा येथील महसूल विभागाने जप्त केला होता हा वाळू साठा चोरीस गेला असून यास कोणाची मूक संमती तर नाही ना ? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, या मुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि १० डिसेंबर रोजी तालुक्यातील निंभोरासीम येथे अवैध वाळूवर कारवाईसाठी महसूल पथक गेले असता , गेलेल्या पथकाला दत्त मंदीरच्या मागच्या बाजूला एक अवैध वाळूचा साठा तर दूसरा बोहर्ड-निंभोरासिम शिव रस्त्यावर एक वाळूचा साठा असा एकूण ५०० ब्रास अवैध वाळूचा साठा आढळून आल्याने हा वाळू साठा जप्त करून पोलिस पाटील यांच्या ताब्यात दिला होता. यानंतर संबंधीत वाळू साठा तस्करांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. प्रशासनाच्या दिरंगाई मुळे शासनाला लाखो रूपयाचा चुना लागला , जप्त केलेली वाळू उघड्यावर होती त्यामुळे वाळु साठ्याचे संरक्षण सुध्दा करणे महत्वाचे होते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तात्परर्य दाखवत लिलावाच्या कार्यवाहीला गती देणे अपेक्षित असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले ,असे मुद्दामहून केले की काय असा प्रश्न निर्माण होतो. शासकीय दरानुसार एक ब्रास वाळूचे दर ४ हजार २०० रुपये आहे. या प्रमाणे महसूल पथकाने जप्त केलेली ५०० ब्रास वाळू ही शासकीय दरा प्रमाणे २१ लाख रूपयांची असून जप्त केलेली वाळू लिलाव होण्या आधीच चोरीला गेल्याने चर्चेला उधाण आले आहे.

जप्त केलेल्या वाळूची तात्काळ लिलाव करून विल्हेवाट लावत दंड वसूल करणे गरजेचे असताना महसूल प्रशासनाने ढिलाईपणा केला आणि जप्त केलेल्या वाळूचा लिलाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे दि ४ डिसेंबर म्हणजे तब्बल २४ दिवसांनी पत्रव्यवहार करण्यात आला होता. आज ३० डिसेंबर रोजी जप्त केलेल्या वाळू साठ्याची रिअँलीटी चेक केले असता सर्व वाळू चोरी गेली आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने त्याचा फटका शासनाच्या तिजोरीला बसला आहे. हे दुर्लक्ष्य जाणून बुजून तर केले गेले नाही ना ? प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!