३० जून पर्यंत करा ही महत्त्वपूर्ण कामे, अन्यथा होईल नुकसान
आर्थिक वर्ष हे ३१ मार्च रोजी संपतं. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आला. यामुळे आर्थिक वर्षाचा कालावधी ३० जून पर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे येत्या ३० जूनपर्यंत स्रव आर्थिक कामं उरकून घ्या, नाही तर नुकसान होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या कामांबद्दल सांगणार आहोत, जी कामं ३० जूनपर्यंत पूर्ण न केल्यास नुकसान होऊ शकतं.
छोट्या बचत योजनांमध्ये किमान रक्कम गुंतवा
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) किंवा सुकन्या समृद्धि योजना (एसएसवाय) सारख्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूकदाराने आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत किमान रक्कम गुंतवावी लागेल, जेणेकरून खाते सक्रिय राहील. लॉकडाऊनमुळे लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूकीची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली. पीपीएफमध्ये गुंतवणूकदाराला वर्षाकाठी किमान ५०० रुपये गुंतवावे लागतात. त्याचबरोबर सुकन्या समृद्धि योजनेमध्ये किमान २५० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.
पॅन कार्ड आधारशी लिंक करा
आपला पॅन कार्ड क्रमांक (पॅन) आधारशी जोडण्याची शेवटची तारीखही ३० जून आहे. आपण अद्याप आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नसेल तर ३० जून २०२० पर्यंत लिंक करुन घ्या. आपण हे केलं नाही तर आपलं पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि जर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झालं तर आपण आर्थिक व्यवहार करण्यास सक्षम राहणार नाही.
वित्त वर्ष २०१९ साठी आयटीआर दाखल करा
सामान्यत: आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. तथापि, एखादी व्यक्ती मूल्यांकन वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा ३१ मार्च उशीरापर्यंत आयटीआर दाखल करू शकते. वित्तीय वर्ष २०१९ साठी आयटीआर उशिरा दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२० होती, जी ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. आता ज्यांना विलंबित आयटीआर किंवा वित्त वर्ष २०१९ साठी सुधारित परतावा भरायचा आहे, ते ३० जून २०२० पर्यंत ते दाखल करू शकतात. मागील आयटीआर दाखल करताना एखाद्याने चूक केली असेल तर ते ३० जूनपर्यंत सुधारित आयटीआर पुन्हा दाखल करू शकतात.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा