७०० रुपयाची लाच भोवली; प्रभारी सहाय्यक दुय्यम निबंधक एसीबी च्या जाळ्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पाचोरा (प्रतिनिधी)। मूल्याकन दाखला देण्याच्या मोबदल्यात शासकीय फी व्यतिरिक्त ७०० रु, लाचेची मागणी केल्याने एसीबी ने पाचोरा, दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहाय्यक दुय्यम निबंधकास रंगे हात पकडले.
पाचोरा येथील तक्रारदार यांनी न्यायालयात वारस दाखल्याचे प्रकरण दाखल करणे कमी मौजे लोहरी,ता,पाचोरा येथील शेतं मिळकती व घर मिळकतीच्या ऐकूण आठ उताऱ्याचे मूल्यांकन दाखला मिळणे साठीअर्ज सादर केला असता मूल्ल्यांकन दाखला देण्याच्या मोबदल्यात ज्ञानदेव साहेबराव चव्हाण, प्रभारी सहाय्यक दुय्यम निबंधक , दुय्यम निबंधक कार्यालय, पाचोरा ,ता, पाचोरा,जि.जळगाव ,रा.संभाजीनगर.पाण्याच्च्या टाकी जवळ,यांनी पंचासमक्ष तक्रारदार याचे कडे शासकीय फी व्यतिरिक्त ७००/-रुपयाची लाचेची मागणी केली असता सापळा रचून डीवायएसपी. गोपाल ठाकूर,पीआय ,निलेश लोधी,पीआय,संजोग बच्छाव, सफौ.रविंद्र माळी,पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर. यांनी कारवाई केली असून जिल्ह्यातील बहुतेक सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयात शासकीय फीच्या व्यतिरिक्त कितीतरी पटीने लाचेची मागणी केली जात आहे,त्याचेवर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी आहे.