अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशनतर्फे ६७ विध्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
भुसावळ (प्रतिनिधी)। अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशनने गणेशोत्सवात पाच दिवस ‘ एक दुर्वा समर्पणाची ‘ उपक्रम हाती घेतला आहे.त्यात तिसऱ्या दिवशी भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर येथे ६७ विध्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी पोलीस पाटील रवींद्र पवार हे होते.प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजय पवार ,उपाध्यक्ष देशमुख पवार,सदस्य गोरख राठोड ,ग्रामपंचायत सद्स्य ज्ञानेश्वर पवार ,उषा फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप जावळे ,पांडुरंग महाजन, मुख्याध्यापक संजय वंजारी,उपशिक्षक प्रदिप सोनवणे हे होते. सुत्रसंचालन सह समन्वयक भूषण झोपे यांनी केले.प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील यांनी तर आभार समन्वयक निवृत्ती पाटील यांनी मानले.
माजी ग.स. संचालक योगेश इंगळे यांनी अंतर्नादच्या उपक्रमांन विषयी माहिती दिली.या पुढील काळात अंतर्नाद तर्फे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांन साठी व्यापक प्रमाणात मदतनिधी उभारून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उषा फाउंडेशनचे सचिव जिवन महाजन,रवींद्र पढार ,विजय पाटील, दीपक सुरवाडे,सौरभ जावळे आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पाटी-पेंसील,४ वह्या,पट्टी,पेंसील – खोडरबर,पेन, रंगपेटी असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. स्वच्छतेला द्या प्राधान्य प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवताना वाचन,चिंतन ,मनन आणि स्वच्छतेला महत्व द्या.वर्गात लक्ष देउन शिक्षक जे शिकवतात त्याकडे लक्ष द्यावे आणि ते जे शिकवतात ते आचरणात आणावे असा सल्ला भुसावळ शिक्षक पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना दिला.उपेक्षित विध्यार्थ्याना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अंतर्नाद आणि उषा फाउंडेशन राबवित असलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजय पवार यांनी काढले.