अखेर त्या कोब्रा नागाला पाळत ठेऊन नवव्या दिवशी पकडले
सावदा (प्रतिनिधी)। येथील शेखपुरा भागात दिनांक २३ रोजी शेख इम्रान शेख मोहम्मद या ३२ वर्षीय या तरूणाचा अज्ञात प्राण्याच्या चाव्याने मृत्यू झाला होता. त्या कारणास्तव अचानक घडलेल्या दुर्दैवी मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सादर तरुणाच्या मृत्यू नांतर सलग नऊ दिवसापासून शेखपुरा भागातील तरुण रहिवासी मयत झालेल्या घटनास्थळी तरुणाचे घरात विषारी प्राण्याने दंश केला होता. त्याच्या घरात या भागातील तरुण अहोरात्र त्या प्राण्यावर पाळत ठेवली होती सदर भीतीपोटी तरुणाचे नातलग घरातील सर्व मंडळी राहते घर सोडून नातेवाईकाकडे रहात होते या भागातील रहिवाशांना मध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती या घरात सर्प शोधण्यासाठी बरेच सर्पमित्र ना पाचारण करण्यात आले होते मात्र साप चुकारा देत घरात दडून बसला होता .अखेर दिनांक ३१ रोजी सकाळी१० वाजता फैजपूर येथील शशांत नंदाने वय २२ वर्ष या सर्पमित्र त्याच घरात कसून शोध घेऊन तो किमान ४ते ५ फूट लांबीचा हिरवट रंगाचा कोब्रा जातीचा सर्प शोधून पकडला , सर्प पकडला गेल्याने त्या भागातील रहिवासी , सर्पदंशाने मयत झालेल्या कुटुंबांनी व रहिवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला ,मात्र शेख इम्रान शेख मेहमूद हा मनमिळाऊ तरुण रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत असताना सर्व समाजाची त्याची नाळ जोडलेली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ,नागाच्या चावण्याने मृत्यू झाल्याची चर्चा मात्र होत आहे.