अज्ञात माथेफिरूने सावदा रेल्वे स्थानकाजवळ जाळली वाहने !
सावदा (प्रतिनिधी)। सावदा रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री अज्ञात माथेफिरूनी लक्ष्मण काशिनाथ शिंदे यांच्या कोल्डे स्टोअरेज युनिटमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांना आग लावून पेटवून दिले.
सावदा रेल्वे स्थानकाजवळ लक्ष्मण काशिनाथ शिंदे यांचे कोल्ड स्टोअरेज आहे. काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास काही कारण नसताना येथे येऊन कोल्ड स्टोरेज समोर येऊन झोपलेल्या वॉचमन ला मारहाण व शिवीगाळ करून ज्वलन शील पदार्थ त्यांच्या शेडमध्ये उभ्या असणारी फोर व्हीलर स्विफ्ट डिझायर गाडी नंबर एम.एच. ०२ बी.पी. २४७३, होंडा कंपनीची मोटारसायकल एम.एच.१९ सी.पी. ९२७६, चार ते पाच केळीचे प्लास्टिकचे केरेट, इलेक्ट्रिक मीटर, वायर, सी.सी.टी.व्ही. केमेरे यांचेवर टाकून आग लाऊन पेटवून दिले त्यामुळे सर्व मिळून एकूण २,२८,०००/- रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अग्निशामन दलाच्या गाड्यांनी आग विझवण्यास मदत केली. लक्ष्मण शिंदे यांच्या सीसीटिव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून त्याचा तपास सह.पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. युसुफ तडवी व पांडुरंग सपकाळे हे
करीत आहे येत आहे.