अज्ञात वाहनांच्या धडकेत तरुण ठार !
जळगाव, प्रतिनिधी । शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मामुराबाद येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली असून तरुण कानळदा येथून घरी येत होता.
सविस्तर असे की, शनिवारी १९ सप्टेंबर २०२० रोजी तालुक्यातील ममुराबाद येथील रहिवाशी रईस हबीब शहा फकीर (वय-३८) हे भंगार जमा करण्याच्या व्यवसाय करतात दिवसभर व्यवसाय करून घरी येत असताना कानळदा-ममुराबाद रस्त्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी करण्यासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पो.कॉ. ईश्वर लोखंडे करीत आहे.