अपंगांनसाठी राखीव निधी तात्काळ द्यावा- प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी
मलकापूर (प्रतिनिधी)। कोरोनासारख्या महामारीमुळे सर्व जनता त्रस्त झाली असून अपंग बांधवांचाही रोजगार बुडून त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अपंगांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी त्यांना तात्काळ वितरीत करण्यात यावा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आज २९ जून रोजी एका निवेदनाद्वारे देण्यात आला.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद, नगर पंचायत यांनी अपंगांकरीता ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येवून हा निधी अपंग व्यक्तींना वाटप करण्याचे आदेश निर्गमीत केलेले आहे. परंती नगर परिषद मलकापूरच्या वतीने अपंगांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधीचे अद्यापपर्यंत वाटप करण्यात आलेले नाही. सद्या सर्वत्र कोरोना परिस्थिती असून यामुळे सर्वांचेच रोजगार बुडाले आहेत. त्यातच अपंग बांधवांना सुध्दा रोजगार उपलब्धी नसल्यामुळे त्यांच्या समोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने त्यांच्या भावनांचा विचार करता तात्काळ न.प.च्या वतीने अंपगांकरीता राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे त्यांना वितरण करण्यात यावे. जेणे करून त्यांना या कोरोनाच्या महामारीमध्ये दिलासा मिळून त्यांच्या प्रपंचाकरीता हातभार लागेल, असे निवेदनाच्या शेवटी नमूद असून येत्या ७ दिवसात अपंगांना न.प.च्या वतीने त्यांच्या हक्काचे असलेले ५ टक्के निधीचे वितरण न झाल्यास प्रहार संघटनेच्या वतीने संबंधित अधिकारी व कर्मचार्यांच्या कानशिलात वाजविण्यात येईल असा गंभीर इशारा निवदेनाच्या शेवटी दिला आहे.
सदर निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप, तालुका प्रमुख अजित फुंदे, शहर प्रमुख शालीकराम पाटील, युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार,