अफवांवर विश्वास ठेवू नका,अद्याप १० वि,१२ वि च्या निकालाची तारीख जाहीर नाही; – CBSE
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीखा १० जुलै आणि १३ जुलैला जाहीर झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर झाली नसून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं सीबीएसई बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. सीबीएसईने या वृत्ताचं खंडन केलं आहे.
#FakeNewsAlert #cbseforstudents #students pic.twitter.com/9Jaf5Mch2u
— CBSE HQ (@cbseindia29) July 9, 2020
दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेविषयी अशी काही सूचना आल्यास, त्यावर विश्वास ठेवू नका. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल. सध्या सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेसंदर्भात अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. सीबीएसई दहावी आणि बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत येऊ शकेल. ही माहिती सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात आपल्या अधिकृत निवेदनात दिली आहे. परंतु मंडळाकडून कोणतीही विशिष्ट तारीख जाहीर केलेली नाही. त्याचबरोबर सीबीएसईनेही ट्विट करुन ही अधिसूचना नाकारली आहे. अद्याप निकालाची तारीख जाहीर केली नसल्याचं म्हटलं आहे.