अलकवी शिक्षण संस्था व ओरिजिनल पत्रकार संघा तर्फे सावदा येथे शिवजयंती साजरी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा (प्रतिनिधी): संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतभर कोरोनाच्या दहशत पसरली असताना शासनाच्या दिशानिर्देशांनुसार ओरिजिनल पत्रकार संघ सावदा आणि अलकवी एज्युकेशन संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे दैवत. त्या अनुषंगाने उर्दू शाळेत ओरिजनल पत्रकार संघ. सावदा सलग्न महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ.मुंबई.व अलकवी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक उर्दू शाळेत शिवजयंती चे आयोजन केले गेले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्था अध्यक्ष सैय्यद अजगर सैय्यद तुकडू हे होते, या प्रसंगी सचिन सकळकळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे खरे जाणते राजे होते त्यांच्या छत्र छाये खाली सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत होते असे प्रतिपादन केले तर….शेख फरिद यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांना सोबत घेऊन सर्व धर्माना समान न्याय देणारे आणि शत्रूला देखील सन्मानाने वागवणारे दिलदार प्रजादक्ष एकमेव राजे असल्याचे मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी अलकवी संस्थेचे अध्यक्ष सैय्यद अजगर सैय्यद तुकडू, ओरिजिनल पत्रकार संघांचे अध्यक्ष युसूफ शहा, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, सल्लागार भानुदास भारंबे,कैलास परदेशी,प्रदीप कुळकर्णी, कन्या शाळेचे सचिन सकळकळे,शेख फरीद, उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक..जफरखान सर, दानिश अख्तर सर, सादिक सर, शाकिर सर, असद सर, अशरफ सर, सद्दाम सर, नबिला फातेमा मँडम आदि नागरीक उपस्थित होते. यापुढेही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण तयार असल्याची ग्वाही संस्था अध्यक्ष सैय्यद तुकडू यांनी याप्रसंगी दिली.सुत्रसंचालन दानिश अख्तर सर यांनी केले.