भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; अल्पवयीन मुला विरुद्ध गुन्हा दाखल.

यावल (प्रतिनिधी)। यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे एका चौदावर्षीय अल्पवयीन मुलीचा गावातीलच एका अल्पवयीन मुलाने विनयभंग केला. गेल्या आठवडाभरापासून सदर मुलाने या मुलीचा वारंवार पाठलाग करून ‘आपण तुझ्यावर प्रेम करतो’ असे सांगत स्वतः आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे.


आठवडाभरापासून गावातील एक अल्पवयीन मुलाने तिचा पाठलाग करून ‘मी तुझ्याशी खूप प्रेम करतो असे सांगून तू पण माझ्याशी प्रेम कर. मी तुला मोबाईल घेवून देईल’ असे सांगितले. त्यास नकार दिला असता त्या अल्पवयीन मुलाने स्वतःच्या हात हातावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी फिर्याद डाभुर्णी येथील अल्पवयीन मुलीने यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान सादर पीडित मुलीने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितल्यानंतर तिला नातेवाईकांकडे विदगाव, ता.जळगाव येथे पाठवण्यात आले. मात्र तिथे देखील गुरुवारी हा मुलगा जाऊन पोहोचला. तेव्हा मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी यावल पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. अखेर या प्रकरणी त्या अल्पवयीन मुलाविरुद्ध विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!