भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावभुसावळ

अवैद्य दारू विक्री; चार पोलिस तातडीने मुख्यालयात जमा

भुसावळ(प्रतिनिधी)। लॉकडाऊन काळात बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकून एका ढाब्यावरून दोन लाख रूपयांचा मद्यसाठा पकडला होता. हा मद्यसाठा एका पोलिसाचा असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या हॉटेल चालकाशी चार पोलिस कर्मचार्‍यांचा संपर्क असल्याचे चौकशीत समोर आले.

यामुळे डीवायएसपी गजानन राठोड यांनी या प्रकरणी चौकशी केली होती. त्यांनी दिलेल्या गोपनीय अहवालानुसार पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढें यांनी गुरूवारी बदलीचे आदेश काढत बाजारपेठ पोलिस ठाण्यातील तीन व शहर पोलिस ठाण्यातील एक अशा चार जणांचे मुख्यालय हलविले आहे. लॉकडाऊन सुरू असतांना एका ढाब्यावरील अवैध दारूविक्रेत्याच्या संपर्कात असल्याचे सिध्द झाल्यावर भुसावळातील चार पोलीसांना तातडीने मुख्यालयात जमा करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार आता नरेंद्र चौधरी, नीलेश बाविस्कर, सुनील सैंदाणे व प्रशांत चव्हाण या चार पोलिस कर्मचार्‍यांची तातडीने पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!