भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

अवैध गौण खनिज:यावल पोलिसांनी ट्रॅक्टर पकडले, यावल महसुलसह सर्कल चे दुर्लक्ष.

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल ( प्रतिनिधी) । यावल- बोरावल रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व पोलिसांनी पकडून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने वाळू वाहतूक दारामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

यावल-बोरावल-पिंपरी शेळगाव बॅरेज रस्त्यावर नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर तापी नदी असल्यामुळे तापी नदी परिसरात आणि खोऱ्यातुन नदी,नाल्यातून अवैध वाळू,माती आणि गाळ वाहतूक यावल बोरावल रस्त्याने रात्रंदिवस सुरू आहे, यावल पासून यावल-बोरावल-शेळगाव बॅरेज- असोदा,भादली मार्गे जळगाव हा फक्त 28 ते 30 किलो मिटर अंतराचा रस्ता असल्याने तसेच हा रस्ता गेल्या वर्षी नऊ नऊ मीटर रुंद अंतराचा डांबरीकरण झाल्याने या रस्त्याने इतर वाहनांची वर्दळ तापी नदीवर पूल नसल्यामुळे नसली तरी मात्र इतर दुचाकी व लहान चार चाकी वाहने तसेच ट्रॅक्टर डंपर यांची वाहतूक सुरू आहे याच रस्त्याने यावल सर्कल शेखर तडवी हे आपल्या शासकीय कामानिमित्त दररोज ये-जा करीत असतात परंतु अवैध गौण खनिज वाहतूक करणारे त्यांना चकवा देऊन दिशाभूल करून अवैध गौण खनिज सर्रासपणे वाहतूक करीत आहे यावल शहरातील विविध बांधकामाच्या ठिकाणी आणि वीट पट्ट्यांच्या ठिकाणी अनुक्रमे वाळू आणि गाळ येतो कुठून गाळ वाहतुकीची परवानगी काही प्रमाणात काढली असली तरी रॉयल्टी चुकविण्यासाठी हजारो ब्रास गाळ,वाळू, माती वाहतूक केली जात आहे.याकडे यावल महसूल सह यावल सर्कल यांचे दुर्लक्ष होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान पठाण पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे,सिकंदर तडवी हे दि.20एप्रिल2021रोजी बोरावल टाकरखेडा परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनजागृतीसाठी गेले असता बोरावल गावाजवळ ट्रॅक्टर क्र.एम.19- 0296 मध्ये ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये अवैध वाळू भरून वाहतूक करीत असताना आढळून आले,ट्रॅक्टर वरील चालक विकास कोळी, ट्रॅक्टर मालक श्रीराम सोनवणे राहणार भालशिव यांना वाळू वाहतुकीचा परवाना बाबत विचारणा केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याजवळ वाळू वाहतुकीचा परवाना नसल्यामुळे यावल पोलिसांनी ते ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून रीतसर पंचनामा करून पो.कॉ. राहुल चौधरी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला भाग-5 गु.र.न.64/2021 भा.द.वि.कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला व दोघ आरोपींना अटक केली. यामुळे वाळू वाहतूकदारांनी मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बोरावल.भालशिव पिंपरी परिसरातून वाळू सह गाळ व माती व इतर गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस अवैध वाहतूक सुरू असल्याकडे मात्र महसूलचे दुर्लक्ष होत असून आतापर्यंत किरकोळ स्वरूपाच्या ज्या कारवाया करण्यात आल्या त्यापैकी ठराविकच लोकांवर(ज्यांचे चांगले राजकीय,सामाजिक,आर्थिक संबंध आहेत त्यांना सोडून) महसूल कडून दंडात्मक कारवाई झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याकडे प्रांताधिकारी कैलास कडलग तहसीलदार महेश पवार यांनी लक्ष केंद्रित करून कारवाई करावी असे सुद्धा बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!