अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या ५ तरुणींसह १३ जणांच्या टोळीला अटक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्कl एका ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन दिअश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या ५ तरुणींसह १३ जणांच्या टोळीला अटकवसांपासून लोणावळ्यातील एका व्हीलावर हा प्रकार सुरू होता. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून तरुण आणि तरुणी एकत्र आले होते. अश्लील व्हिडीओ तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. यामध्ये पोलिसांनी १३ जणांना अटक केली असून दोघे फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देशात अश्लील व्हिडीओ तयार करणं कायद्यानं गुन्हा आहे. या व्हिडिओवर बंदी असतानाही असा प्रकार सर्रास करत असल्याची माहिती मिळाली होती. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काही तरुण आणि तरुणींकडून लोणावळ्यात अश्लील व्हिडीओपाहण्यासाठी तयार केले जात होते. लोणावळ्यात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ जणांमध्ये ५ तरुणींचा समावेश असून सर्वजण वेगवेगळ्या राज्यामधील आहेत. व्हीलावर छापा टाकून १३ जणांना अटक केलीय. तसंच घटनास्थळी पोलिसांनी अश्लील व्हिडीओ शूट करण्यासाठी वापरलेले कॅमेरे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. यात काही अश्लील व्हिडीओ फुटेजचासुद्धा समावेश आहे.