जळगावराजकीय

” आंधळ दळतय अन कुत्र पीठ खातय ” स्वता:च काढली, स्वता:वरच कारवाई करण्याची नोटीस– जि.प सिंचन अधिकाऱ्यांचा प्रताप

जळगाव (प्रतिनिधी)। जी प सदस्या पल्लवी सावकारे यांनी येथील जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातील गौण खनिजाविषयी झालेल्या गैर कारभाराची चौकशी करावी व संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे असता. या प्रकरणात सिंचन अधिकाऱ्याने स्वतःलाच कारवाई करण्याची नोटिस दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जलसंधारण विभागाकडून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जी कामे झाली आहेत त्यांची बिले देतांना गौण खनिजाची जी रक्कम बिलात समाविष्ट केली होती ती रक्कम शासनास जमा न करता रॉयल्टी भरल्याबतचे बनावट कागदपत्र जोडून सदरची रक्कम मक्तेदारास दिली आहे. त्याविषयी बनावट कागदपत्रे जोडल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणी दरम्यान मान्य केले आहे. म्हणजे " *आंधळं दळतय* *अन कुत्र पीठ खातय* " असल्या प्रकारामुळे या बाबत माहिती मागविल्याचे पल्लवी सावकारे यांनी निवेदनात म्हटले आहे.

दिलेल्या निवेदनात, जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी आजवर अपूर्ण तसेच दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. असे सांगत सावकारे यांनी जिल्हा परिषद सदस्य व जल व्यवस्थापन समितीवर असून देखील खरी माहिती देण्यात येत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. आता जलसंधारण अधिकारी एस.एल. पाटील यांनी भडगाव उपविभागाचे अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र, त्याचा पदभार पाटील यांच्याकडेच आहे. त्यामुळे ते हेतुपुरस्कार दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप करून पल्लवी सावकारे यांनी दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करीत शिस्तभंगाची कारवाई व्हावी. अशी मागणी निवेदनात केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!