भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

आईने लावली जीवाची बाजी; बिबट्याशी दोन हात करून वाचवले मुलीचे प्राण

Monday To Monday NewsNetwork।

चंद्रपूर, वृत्तसंस्था: बिबट्याशी दोन हात करत त्याच्या जबड्यातून आपल्या पाच वर्षीय मुलीचा जीव वाचवण्यासाठी आईने जीवाची बाजी लावली अर्चना मेश्राम आपल्या ५ वर्षीय मुलीसह गावाजवळ भाजी तोडण्यासाठी गेली होती. आई भाजी तोडत असताना मुलगी प्राजक्ता थोड्या दूर उभी होती. मात्र बिबट्याची नजर या मुलीवर पडली आणि त्याने हल्ला केला. चंद्रपूर शहराजवळील जुनोना गावाजवळ ही घटना घडली.

बिबट्याचा सामना कसा करायचा यासाठी तिने आरडाओरड सुरु केली. सुरुवातीला अर्चनाला काही कळलंच नाही. मात्र जवळपास कुणीच नसल्याने अखेर तिने बिबट्याशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. बिबट्याने मुलीचं तोंड आपल्या जबड्यात घेतलं होतं. जंगलात नेण्यासाठी प्रयत्न करत असताना तिने क्षणाचाही विलंब न करता बिबट्याशी दोन हात केले. जवळच असलेला दांडा तिने हाती घेतला आणि बिबट्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली.

मात्र, मातृत्वाची आपल्या पोटच्या जीवाला वाचवण्यासाठी घेतलेला आक्रमक बाणा पाहताच बिबट्याने मुलीला सोडून तिथून धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी जखमी झाली आहे. तिच्या चेहरा आणि डोक्यावर जखमा झाल्या. अर्चनाने शुद्ध हरपळेल्या मुलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमी मुलीला नागपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!