आधुनिकता आणि उत्सवाची सांगड घालुन रोहिणी खडसे यांचे समाजप्रबोधन !
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। पूर्वीपासून महाराष्ट्रात गणेश उत्सव प्रचंड उत्साहाने साजरा केला जातो
स्वातंत्र्यपुर्व काळात लोकमान्य टिळक यांनी ज्वलंत राष्ट्रवादाचा जागर गणेशोत्सवातून केला लोकांमध्ये एकात्मतेची भावना वाढावी स्वातंत्र्यासाठी समाजप्रबोधन व्हावे यासाठी त्यांनी या उत्सवाला सार्वजनिक रूप दिले तेव्हापासून आज पर्यंत महाराष्ट्रात गणेश उत्सव हा घरोघरी आणि सार्वजनिक रित्या मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणेश उत्सवात देखावे आणि इतर माध्यमातून जनजागृती समाजप्रबोधन केले जाते कालानुरूप यात अनेक बदल होत गेले पण उद्देश मात्र कायम समाज प्रबोधनाचा राहिला.
दरवर्षी गणेशोत्सवात लोक अष्टविनायक आणि इतर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असतात परंतु यावर्षी जगावर कोरोना महामारीचे सावट आहे त्यामुळे सर्वांना घरात राहूनच गणेश उत्सव साजरा करावा लागला. हि बाब लक्षात घेऊन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांनी सोशल मिडिया च्या माध्यमातून आपल्या फेसबुक, व्हाट्सअप्प ग्रुप, व इतर माध्यमातून अष्टविनायक दर्शन आणि कोरोना वर घ्यायची जनजागृती यावर एक चित्र मालिका सुरू केली आहे यामध्ये त्या दररोज एक चित्र पोस्ट करतात त्याचित्रामध्ये दररोज अष्टवि8गणपती पैकी एका गणपती चे नाव, ठिकाण, पौराणिक महात्म्य सांगितले जाते यामध्ये मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, महडचा वरदविनायक, पालीचा श्री बल्लाळेश्वर या गणपतींचा महिमा, महात्म्य, इतिहासाचे वर्णन केले आहे त्याचबरोबर याच चित्रामध्ये बाप्पा काय म्हणताय ? या शिर्षकाखाली कोरोना पासुन बचाओ व्हावा म्हणून ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्याचा संदेश देऊन समाज प्रबोधन केले जात आहे जसे आजारी पडण्यापासून संरक्षण करा, नियमित हात धुवा, रोज व्यायाम प्राणायाम करा,घर परिसर स्वच्छ ठेवा, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी घरचे सात्विक अन्न खाण्यावर भर द्या, पाणी उकळून प्या, कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी गर्दी टाळा, काम नसताना घराबाहेर पडू नका, बाहेर पडताना मास्क सॅनिटाईझर चा वापर करा, कोरोना संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासन वेळोवेळी चे कोरोना संबंधी निर्देश देत आहे त्यांचं अनुपालन करा असे संदेश देऊन कोरोना बाबत जन जागृती करण्यात येत आहे. पूर्वी पासुन गणेश उत्सवात नाटक, देखावे या माध्यमातून समाजप्रबोधन केले जाते याला आधुनिकतेची जोड देऊन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी सोशिअल मिडिया च्या माध्यमातून आधुनिकीकरण आणि उत्सवाची सांगड घालुन सुरु केलेल्या या चित्र मालिकेला आपल्या फेसबुक व्हाट्सअप्प ग्रुप च्या माध्यमातून रोहिणी खडसे खेवलकर या दररोज पंचविस ते तिस हजार लोकांपर्यंत हे संदेश पोहोचवत आहे यातुन निश्चितच समाजाचे प्रबोधन आणि जनजागृती होण्यास मदत होत असुन सोशियल मिडियाचा एक नविन विधायक वापर समोर येत आहे