आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते सुकी धरणांचे जलपूजन !
सावदा (प्रतिनिधी): सुकी धरण म्हणजे शेतकर्यांचे आशास्थान.ते पूर्ण भरले व ओसंडून वाहू लागले की शेतकरी आनंदतो व सुखावतो. सुकी नदी वाहण्यामुळे शेतकरी आंनदीत झाले, यामुळे संबंधित परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने विहीरी, कुपनलिका यांना खूप मोठ्या फायदा होवून आज उन्हाळ्याची चिंता सदर शेतकरी वर्गाची कमी होईल या आशेने सदर परीसरातील शेतकरी खरे सुखावले आहे,
कालच धरण भरले व त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मां. श्री शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते जलपूजन झाले. सोबत सौ.सुरेखाताई पाटील (जि.प.सदस्या),सौ.प्रतिभा बोरोले,(पं.स.सदस्या), श्री गुणवंत टोंगले, श्री रमेश महाजन, श्री तुकाराम बोरोले, श्री किशोर चौधरी, श्री संजय चौधरी, श्री बापू पाटील, श्री चंद्रकांत भंगाळे, श्री भरत चौधरी, श्री ललित चौधरी, श्री डिगंबर चौधरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.