एकनाथराव खडसेच्या पुस्तकाच्या पिटारीत अनेक खळबळजनक गौप्यस्फोटांसह आणखी काय काय…….!
संपादक- भानुदास भारंबे
” जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे ” या पुस्तकाच्या पिटारीत काय काय असणार ,,,! ;अवघ्या महाराष्ट्रला उत्सुकता .
अथर्व पब्लिकेशन च्या माध्यमातून 2 सप्टेंबर म्हणजे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवस दिवशी “जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे ” या 219 पानाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकाचे लेखक प्रा.डॉ. सुनील नेवे हे असून या पुस्तकात खडसे यांच्या जीवनात आलेल्या सर्व चढ-उतारांसह , व आतापर्यंतच्या खडतर प्रवासा सह आणखी काय काय निघणार या बाबत अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेली असून स्पस्ट व बेधडक वक्तव्य करण्यात परिचित असलेले व गेल्या काळात स्वकीयांच्या षडयंत्रा ला बळी ठरलेले व झालेल्या आरोपातून मुक्त झालेले एकनाथराव खडसे यांच्या या पुस्तकातुन कोणकोणते गौप्यस्फोट होणार या बाबत ची उत्सुकता सर्वाना लागून राहिलेली आहे. या पुस्तका नंतर आणखी एक पुस्तक येणार असून या पुस्तकाचे शीर्षक “नानासाहेब फडनविसाचे बारभाई कारस्थान” हे असून या पुस्तकाची ही तयारी सुरू आहे.हे दुसरे पुस्तक केव्हा प्रकाशित होईल याचीही प्रतीक्षा अवघ्या महाराष्ट्राला लागून आहे.
“जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे ” या पुस्तकाचे प्रकाशन 2 सप्टेंबर रोजी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार , माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागळे हे आनलाइन आपापल्या ठिकाणाहून प्रकाशित करणार असून मुक्ताईनगर नगर येथे खडसेच्या मुक्ताई फ़ॉम हाऊस वर जिल्ह्यातील भाजप नेत्यांसह आमदारांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडणार असून या वेळी एकनाथ राव खडसे यांच्या जीवन पटावर ९ मिनिटांची डाक्यूमेंट्री फिल्मही दाखवली जाणार असून येत्या २ सप्टेंबरची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्रला लागून राहिली आहे.