भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक तारखेपासून लॉकडाऊन उठेलं, असे समजू नका – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन ( lockdown ) मागे घेण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, अर्थव्यवस्थेला आणखी गती देण्यासाठी १ जुलैपासून राज्यातील अनेक गोष्टीत शिथिलता आणणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई:

करोनाचं संकट अद्यापही संपलेलं नाही. त्यामुळे धोका टळलाय असं समजू नका. मी लॉकडाऊन हा शब्द वापरणार नाही. पण स्पष्ट सांगायचं झालं तर ३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही. पण काही गोष्टी आपण हळूहळू शिथिल करणार आहोत, असं सांगतानाच काही गोष्टी शिथिल करणार याचा अर्थ लगेच येत्या १ तारखेपासून सर्व काही अलबेल झालं अशा भ्रमात राहू नका. कुठेही गर्दी करू नका. ज्या भागात गर्दी होईल, त्या भागात पुन्हा पूर्वीसारखाच कडक लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

येत्या ३० जूनपर्यंत राज्यातील लॉकडाऊन संपणार आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन मागे घेण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र लॉकडाऊन मागे घेण्यात येणार नसला तरी राज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि अर्थचक्र गतीमान व्हावं म्हणून अनेक गोष्टीत शिथिलता आणत असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या ३० जून रोजी लॉकडाऊन संपत आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठेल की नाही, याची जनतेला उत्सुकता लागलेली आहे. पण संकट टळलेलं नाही. धोका टळलेला नाही. त्यामुळे स्पष्टच सांगायचं झालं तर ३० जून रोजी लॉकडाऊन उठणार नाही. पण ही परिस्थिती अशीच राहणारही नाही. लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवायचा. आपण एक एक पावलं टाकत पुढे जाणार आहोत. हळूहळू सर्व सोयी सुरू करायच्या. अर्थात म्हणजे घराबाहेर बिनधास्तपणे पडायचं असं नाही. केवळ अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण हे सुरू करत आहोत. धोका टळला या भ्रमात राहू नका. आपण करोनाच्या कात्रीत सापडलो आहोत. सर्व अलबेल झालं असं समजू नका. कारण करोना आ वासून बसलाय. अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर पडू नका, असं सांगतानाच मी तुम्हाला सतत काळजी घेण्यासाठी सांगत असतो. काळजी, काळजी, काळजी… तुम्हाला वाटत असेल हे काय काळजी काळजी करतात. पण आपलं सरकार काळजी वाहू नाही. हे सरकार तुमचं आहे. महाराष्ट्राची काळजी घेणारं सरकार आहे. धोक्यापासून सावध करणारं सरकार आहे, असं ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!