एटीएम कार्ड क्लोनिग करून ४०० कोटी चोरीच्या प्रयत्नांत असणाऱ्या पैकी दोघाना अटक; मनीष भंगाळे माफीचा साक्षीदार
जळगाव (प्रतिनिधी)। महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथराव खडसे हे दाऊदच्या पत्नीशी बोलण्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या मनीष भंगाळे च्या मदतीने एटीएम कार्ड क्लोन करण्याचा गोरखधंदा सुरू करण्याच्या प्रयत्नात असणारी एक टोळी पोलिसांच्या हाती लागली असून धक्कादायक बाब म्हणजे कार्ड क्लोन करून चारशे कोटी रूपयांची चोरी करण्याचा प्लॅन या टोळीने आखला असल्याचे उघळकीस आले यात मनीष भंगाळे हा माफीचा साक्षीदार बनला असून तो वगळता यातील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे मनीष भंगाळे हा चर्चेत आला होता मात्र नंतर त्याचे सर्व दावे खोटे सिद्ध झाल्याने त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, मनीष भंगाळेच्या संपर्कात जळगावातील काही जण आले होते. या लोकांनी मिळून त्याला एटीएम कार्ड क्लोनींग करण्याची मागणी केली. यानुसार त्याने कार्ड क्लोन करून एक हजार रूपये बँक खात्यातून काढलेही दरम्यान, याच प्रकारे एटीएम कार्ड क्लोन करून चारशे कोटी रूपये काढण्याची तयारी या टोळीने केली. मात्र हा सर्व प्रकार लक्षात येताच मनीष भंगाळे याने पोलिसांशी संपर्क साधला. यात पोलीस पथकाने भंगाळे याला माफीचा साक्षीदार बनऊन रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून जळगावातून टोळीतील दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण नऊ जणांना आरोपी बनविण्यात आले असून यातील उर्वरित सात जणांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रा कडून मिळाली,