भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमहाराष्ट्र

एसटी वाहक स्व.मनोज चौधरीना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा– एसटी कामगार सेना सरचिटणीस

मुंबई (खास प्रतिनिधी)। एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मरामापम मुंबई यांना कामगार सेना सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी पत्र दिले असून त्यात जळगांव आगारातील एसटी वाहक स्व मनोज अनिल चौधरी यांनी दिनांक 09/11/2020 रोजी आपली जीवनयात्रा संपवून आत्महत्या केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मृत्यूपूर्वी चिट्ठीत त्या वाहकाने पहिले मुख्य कारण ‘एसटीची कार्यपद्धती’ असल्याचे स्पष्ट नमूद केलेले आहे.

स्व. मनोज चौधरी यांच्याबाबतीत स्थानिक अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवून इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेने जास्तीचे काम करून घेतल्याचे लक्षात आले आहे. ऑक्टोबर 2020 या महिन्यात जळगांव आगारात 250 पेक्षा जास्त वाहक व जवळपास 20 चालक कम वाहक उपलब्ध असतांना प्रत्येक वाहकास सरासरी प्रतिदिन प्रमाणे महिन्याभरात 10 कर्तव्ये करणे गरजेचे असतांना केवळ स्व. मनोज चौधरी यांच्याकडून 18 कर्तव्ये करून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या कोरोनाग्रस्त कालावधीतील स्व चौधरी यांना पुणे, औरंगाबाद, नासिक, नवसारी व सोलापूर सारख्या लांबपल्ल्याच्याच कर्तव्यांवर पाठवून असंवेदनशील व भेदभावयुक्त वर्तन केलेले आहे. या प्रकरणी एसटी महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होऊन कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याने जळगांव आगार व विभाग प्रशासनाने केलेल्या बेकायदेशीर व अन्यायकारक वर्तनाची चौकशी करण्यात यावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी या पत्रात केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!