भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

एस.टी. महामंडळातील कार्यपध्दती व सरकारच्या नावे सुसाईड नोट लिहून जळगावात कंडक्टरची आत्महत्या !

जळगाव (प्रतिनिधी)। शहरातील एस.टी. आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या मनोज अनिल चौधरी यांनी कमी वेतनामुळे आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये मराठी माणसाचे ठाकरे यांचे सरकार हे या स्थितीसाठी जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, मनोज अनिल चौधरी (वय – ३०, रा.कुसुंबा) ( क्रमांक ४९३४३) हे जळगाव आगारात वाहक (कंडक्टर) म्हणून कार्यरत आहेत मागील काही दिवसांपासून कमी पगार व त्यातील अनियमिततेला कंटाळून नैराश्येत गेले होते. आज सकाळी त्यांनी ८ वाजेच्या सुमारास गळफास घेतला. आत्महत्यापूर्व मनोज चौधरी यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यात म्हटले आहे की, एस.टी. महामंडळातील अपुरा पगार आणि यातील अनियमितता यांला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. यास जबाबदार एस.टी. महामंडळातील कार्यपध्दती आणि आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हे आहे. माझ्या व माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझी पी.एफ. व एलआयसी माझ्या परिवाराला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती

लॉकडाऊनमुळे एस.टी महामंडळ आर्थिक अडचणीत आले असल्याने कर्मचार्‍यांचे वेतन थकीत आहे. यातूनच ही आत्महत्या घडल्याने याची भीषणता जगासमोर आली आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांची जिल्हा रूग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी महामंडळाचे अधिकारी येऊन आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!