ऐनपुर-निम्बोल रस्त्याची दुरावस्था;वाहनचालक त्रस्त
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
ऐनपुर ता रावेर(प्रतिनिधी): रावेर तालुक्यातील ऐनपुर ते निम्बोल हा रस्ता खुप वर्दळीचा आहे तसेच ऐनपुर गावाहुन रावेरला जोड़नारा हा रस्ता आहे, ऐनपुर ते निम्बोल या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून जणु काही खड्यानचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे.वाहनधारकांना खड्यानमुळे आपला जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच वाहनधारकांना अश्या परिस्थितीत सुद्धा जीवघेणा प्रवास करावा लागत असून अनेक वेळा या रस्त्यावर किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात,अर्थात हा खड्डेमय झालेला रस्ता अपघातास आमंत्रण देणारा ठरत आहे त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली दिसून येत आहे
हा रस्ता रावेर ला लागुन असल्यामुळे बऱ्याच वेळा गावाहुन रावेर रुग्णालयाला सीरियस पेशंट घेउन जातांना रुग्णाना चांगल्याच यातना सोसाव्या लागतात तरी देखील झोपलेल्या संबंधित प्रशासनाला, विभागाला जाग येईल का, की अपघात झाल्यावरच झोप मोड़ होणार असा सवाल संतप्त वाहनचालकांना तसेच परिसरातील प्रवाशांना पड़त आहे, तरी देखील संबंधित विभागाकडुन याची दखल घेऊन त्वरित ऐनपुर -निम्बोल रस्त्यात असलेले खड्डे बुजविन्यासाठी मुहूर्त काढावा तसेच प्रवाशीवर्ग व वाहनधारकांच्या जीवांशी खेळला जाणारा खेळ आता तरी थांबवावा अशी अपेक्षा वाहनचालकांकडुन तसेच प्रवाशी वर्गाकडुन केली जात आहे