भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

ऐनपुर प्रा.आ. केंद्रात 300 कोविड लसीकरन ; प.स. सभापती कविता कोळी याचे हस्ते सुरुवात

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

ऐनपुर ता.रावेर(प्रतिनिधी): ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी श्री संदीप चवरे व श्री व्ही.डी.महाजन यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 10/03/2021 रोजी ऐनपुर प्राथमिक आरोग्य केन्द्रात पंचायत समिती सभापती सौ.कविता हरलाल कोळी यांच्या हस्ते कोविड लसिकरन केन्द्राचे उद्घाटन करून कोविड लसिकरनाचे लस देण्याचे काम सुरु झाले आहे.लस देण्याचे काम आरोग्य सेविका श्रीमती सुशीला चंदनकर, रेखा कोळी,रोहिणी खलाने ह्या करीत आहे.उपलब्धते नुसार दररोज कोविडशील्ड ची लस देण्यात येत आहे,आजपर्यंत केंद्रात 300च्या जवळपास लसिकरण झालेले आहे.प्रतिबंधित उपाय म्हणून तापासाठी प्रत्येकाला चार गोळ्या दिल्या जातात.

आरोग्य केंद्रात जास्त गर्दी होउ नये,वृद्धाना जास्त वेळ थांबावे लागू नये यासाठी नियोजन केले जाते.
या लसीकरनासाठी आरोग्यसेवक,आरोग्यसेविका, फार्मासिस्ट,गतप्रवर्तक,आशावर्कर आणि स्टाफ चे सहकार्य लाभत आहे तसेच लसीकरनासाठी चांगला प्रतिसाद ही मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!