भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे रावेर तहसीलदार यांना विविध मागण्याचे निवेदन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपुर (प्रतिनिधी)। रावेर तहसील कार्यालय येथे आदिवासींच्या सामाजिक मागण्या मान्य कराव्यात यासाठी ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन तर्फे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यातील खरे आदिवासींच्या सामाजिक मागण्या मान्य कराव्या ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जळगाव शाखा व अधिकारी कर्मचारी कर्मचारी संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य मध्ये खरे आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध शासकीय योजना राबविल्या जातात हे सत्य असले तरी सदरच्या योजना तळागळातील दऱ्याखोऱ्यातील दरिद्रयाच्या खाईत कितपत पडलेल्या अत्यंत गरीब घरची खऱ्या आदिवासी पर्यंत पोहोचत नसल्यामुळे महाराष्ट्रातील देशातील खरा आदिवासी जसा होता तसाच हलाखीचे जीवन जगत आहे हे सत्य आहे त्यासंदर्भातील मुख्य कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर आमच्या सामाजिक व फेडरेशन संघटनेने आपल्याकडे सादर केलेल्या निवेदनातील मागण्या वरून निश्चित निदर्शनास येईल असे निवेदनात नमूद केले आहे फेडरेशन संघटनेच्या जळगाव शाखा च्या वतीने 34 मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन जळगाव जिल्हा शाखा उपाध्यक्ष सलीम बाबु तडवी, दिनेश वळवी,हबीब ए तडवी ,अजित डी जमादार ,संजय तडवी ,लतीफ तडवी ,कासम तडवी ,राजू तडवी ,रहीम तडवी, बी आर तडवी, प्रकाश ,सोनवणे, दिल रुबाब तडवी ,इरफान तडवी, नबाब तडवी ,विलास भिल, मुसा तडवी,अमजत तडवी , आदी संघटनेचे कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!