ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या सांविधानिक न्याय मागण्यासाठी मुक्ताईनगर जय भगवान महासंघातर्फे निवेदन
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। ओबीसी.विमुक्त जाती.भटक्या जमाती विशेष मागास जातींचे अनेक प्रश्न वर्षनुवर्षे प्रलंबित आहेत या मागण्या मान्य करण्यासाठी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटल्या निसार ओबीसी.विमुक्त जाती.भटक्या जमाती विशेष मागास जातींचे अनेक प्रश्न वर्षनुवर्षे प्रलंबित आहेत जसे १)सन २०२१ ची सार्वत्रिक जनगणना केंद्र सरकार जातीनिहाय करणार नसेल तर महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात जातीनिह्याय जनगणना करण्यात यावी. २) मराठा समाजाचे ओबीसिकरण करू नये, ३)शासकीय सेवामधील ओबीसी चा अनुशेष लवकर भरण्यात यावा, ४)ओबीसीच्या महाज्योती या संस्थेसाठी रु १००० कोटीची तरतूद करण्यात यावी, ५)बारा बलुतेदारांच्या आर्थिक विकासासाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ सुरु करावे त्यासाठी १०० कोटी तरतूद करावी या व अशा इतर अनेक मागण्यांचे निवेदन आज मुक्ताईनगर येथे नायब तहसीलदार झांबरे यांना जय भगवान महासंघ संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली जय भगवान महासंघाचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष देवानंद वंजारी,शहर अध्यक्ष योगेश काळे ,दिपक पधार,दिपक नाईक,विजय काळे,राजेंद्र वंजारी,कृष्णा पालवे,राजेंद्र पालवे,गजानन वंजारी,वैभव वंजारी,आनंदा नाईक,दिपक वंजारी यांनी दिले