भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

काळी हळदीचा व्हिडीओ दाखवून तरुणांला मारहाण करून लूट

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। अहमदनगर येथील तरूणाला हलखेडा ता,मुक्ताईनगर येथें काळी हळदीचा व्हिडिओ दाखवून फसवणूक केली तसेच तरूणासह त्याच्या मित्राला बेदम मारहाण करून खिश्यातील तीन हजाराची रोकड व दुचाकी लांबविल्याची घटना घडली.

या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सचिन आप्पासाहेब चंदनसे (वय-२८) रा. वडगाव गुप्ता ता. जि. नगर हा तरूण आपल्या मित्रासह दुचाकी एमएच १६ सीपी ५९८९ ने मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता आले होते. त्यावेळी राजू शिवाजी (पुर्ण नाव माहित नाही), राजूचे वडील शिवाजी (पुर्ण नाव माहित नाही) आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती यांनी सचिन चंदनसे यांना काळी हळदीचा व्हिडीओ दाखवून त्याची फसवणूक केली. तसेच तरूणासह त्याच्या मित्राला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून खिश्यातील ३ हजार रूपये, मोबाईल काढून घेतला. आणि मित्राची दुचाकी हिसकावून घेतली. याप्रकरणी तरूणाने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पोलीसांना घटना कथन केली असता या प्रकरणी सचिन चंदनसे यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरूध्द मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!