कुसूंबा बु। येथे बेटी बचाओ बेटी पढाओ हा कार्यक्रम संपन्न
रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील कुसूंबा बु येथे महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या,बेटी बचाओ, बेटी पढाओ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात कुसू्ंबा बु अंगणवाडीत साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित अंगणवाडी पर्यवेक्षिका क्ष्रीमती सरिता दडमल,एकात्मिक बाल विकास सेवा योजना क्र-2,डॉ रितेश चंदलवार नैसर्गिक उपचार केंद्र रावेर,कुसूंबा बु! आरोग्य सेविका,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती समाजसेवक, जे एस जावळे विद्यालय कुसूंबा चे सचिव नारायण रामभाऊ घोडके,अंगणवाडी सेविका शोभा नारायण घोडके,वंदना भगवान महाजन,लता पांडुरंग महाजन,सरोज जयवंतराव जावळे,हसीना गफुर तडवी,मदतनीस,मुन्ना हमीद तडवी,इंदुबाई संतोष महाजन,बेबाबाई मधुकर पाटील,रब्बना इब्राहिम तडवी,ज्योती भालेराव , पत्रकार हमीद तडवी हे उपस्थित होते.कार्यक्रमात सुरुवातीला मुलींचे स्वागत करण्यात आले.बेटी बचाओ,बेटी पढाओ कार्यक्रमात कुसूंबा येथील बहुसंख्य मुलींनी सहभाग घेतला,यावेळी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.सर्वांनी बेटी बचाओ,बेटी पढाओ या उपक्रमाबाबत उपस्थित कर्मचारी,पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.