कुसूंबा-रावेर रस्त्याची दुर्दशा; खड्ड्यात रास्ता की रस्त्यात खड्डा.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील कुसूंबा ते रावेर हा रस्त्याची गेल्या दोन वर्षापासुन दुर्दशा झाली असून खड्डड्यात रास्ता की रस्त्यात खड्डा हेच समजेनासे झाले आहे,
या रस्त्याला उतरती कळा लागल्याने ह्या रस्त्याने प्रवास करीत असतांना वाहन धारकांना, प्रवाशांना, शेतकऱ्यांना मजुरांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे,कारण या कुसूंबा ते रावेर या रस्त्यात जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने रहदारीला खुप मोठा अडथळा निर्माण झाला आहे,त्याचबरोबर या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांमधे मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे.हा संपूर्ण प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना माहिती असल्यावरही जाणीवपुर्वक या कुसुंबा ते रावेर रस्त्यांसह संपुर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चिञ दोन वर्षापासुन पहावयास मिळत आहेत.
तसेच संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी देखील ह्या रस्त्यांकडे दुर्लक्ष करुन बघ्याची भुमिका घेत आहे,आणि रावेर तालुक्यासह तसेच पाल ते इंदोर हा रस्ता हायवे बनल्याने संपुर्ण भारतातुन मोठमोठे ट्रक क्षमतेपेक्षा जास्त भरतीचे ट्रक हे राजस्थान, दिल्ली, झारखंड, हरियाना,पं जाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश कडुन या रस्त्याने येजा करीत असतात यामुळे देखील लहान वाहनधारकांचा, प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.याकडे परिवहन अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते, तरी संबधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब कुसुंबा ते रावेर, लोहारा ते कुसूंबा मार्गावरील १ ते २ किलोमीटरचा रस्ता सुकी नदी पुला पर्यंतचा रस्ता ताबडतोब डांबरीकरण करावे अशी मागणी केली जात आहे.