भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावयावलराजकीयराष्ट्रीयसामाजिक

केळी पिक विम्यासाठीचे अन्यायकारक निकष बदलण्याची केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांची ग्वाही

यावल (प्रतिनिधी)। हवामानावर आधारित केळी फळपिक विमा योजना ,पानवेली करिता पॅकेज,जिल्ह्यात रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा तसेच ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी यांत्रिकीकरणांतर्गत अत्याधुनिक अवजार केंद्र उभारण्यात यावे या मागण्यांवर केंद्रीय कृषी मंत्र्यांची तात्काळ कार्यवाहीचे दिले आदेश.

जळगाव हवामानावर आधारित केळी फळपिक विमा योजना अन्यायकारक निकष बदलणे,पानवेली उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज,जिल्ह्यात रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा तसेच ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी यांत्रिकीकरणांतर्गत अत्याधुनिक अवजार केंद्र उभारण्यात यावे या मागण्यांसाठी आज नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांची माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी भेट घेतली यावेळी त्यांच्या सॊबत खासदार उन्मेश दादा पाटील उपस्थित होते.या मागण्यांबाबत सविस्तर माहिती माजी मंत्री गिरीश भाऊ महाजन व खासदार उन्मेश दादा पाटील यांनी मंत्री महोदयांसमोर मांडली यावर केंद्रीय कृषी मंत्र्यांची तात्काळ कार्यवाहीचे दिले आदेश दिल्याने लवकरच हवामानावर आधारित केळी फळपिक विमा योजना निकष पूर्ववत होणार आहेत.आज नवी दिल्लीत माजी मंत्री तथा आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रजी तोमर यांची भेट घेतली.यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील उपस्थित होते. केळी फळपिक विमा योजना निकष पूर्ववत होणार जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने कपाशी सोबत केळी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासन काळात प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेच्या केळी पिकाच्या मानकणांमध्ये शेतकऱ्यांच्या हित लक्षात घेऊन अटी व शर्ती यांचा समावेश करून बळीराजास पोषक अशी हवामानावर आधारित अशी विमा योजना निकष ठरविण्यात आले होते. मात्र सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने 2020 -21 ते 2022 – 23 या कालावधी करिता केळी पिकांच्या निकषांमध्ये अतिशय अन्यायकारक बदल केले असून यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून याचा पुनर्विचार होऊन सन 2019-20 चे निकष कायम ठेवावेत.अशी मागणी करण्यात आली होती यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक चर्चा करीत राज्य सरकारला आदेश देऊन निकष पूर्ववत ठेऊ अशी ग्वाही कृषी मंत्री तोमर यांनी दिली. पानवेली करिता विशेष पॅकेज द्यावे जिल्ह्यातील पानवेल (विड्याची पाने) लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकरीता आजतागायत शासनामार्फत कुणीही कुठलीही योजना अथवा मदत जाहीर झालेले व मिळालेले नाही. लॉक डाऊन च्या काळात सदरील शेतकरी भरडला गेलेला असून पानवेली करिता विशेष पॅकेज अथवा योजना जाहीर करावी.

जिल्ह्यात रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा
जळगाव जिल्ह्यात रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा तसेच ज्या वेळी शेतकरी खत खरेदी करतात त्यावेळी आधार नोंदणीची प्रणाली सुरळीत व्हावी जेणेकरून उपलब्ध रासायनिक खतांचा साठ्याचा काळाबाजार करणे थांबवता येईल.
कृषी यांत्रिकीकरण संदर्भात अत्याधुनिक अवजार केंद्र व अत्याधुनिक नर्सरी उभारण्यात यावे.
आपल्या कृषी विभागाच्या कृषी क्षेत्राचे यांत्रिकीकरण या हेतुला बळकटी मिळावी याकरिता जळगाव शहराजवळ असलेल्या ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्र जळगाव फार्मवर कृषी यांत्रिकीकरण संदर्भात अत्याधुनिक अवजार केंद्र उभारण्यात यावे. मुबलक जमीन असलेल्या या केंद्रात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्याने उपलब्ध होणारी अवजारांचे प्रात्यक्षिक त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहून कृषी क्षेत्राच्या यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देता येईल. तसेच कृषी विज्ञान केंद्राची स्वतंत्र अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली नर्सरी निर्माण करण्यात यावी ज्यामध्ये भाजीपाला, फळे, फुले इत्यादी पिकांची उच्च दर्जाची रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध होतील याकरिता प्रयत्न व्हावेत. या समस्या व मागण्या बाबत उचित सहकार्य मिळावे अशी विनंती माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रजी तोमर यांचे कडे केली या सर्व मागण्या संदर्भात तात्काळ आदेश देऊन या मागण्या मार्गी लावण्याची ग्वाही केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्रजी तोमर यांनी यावेळी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!