कोचुर बु॥ ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाची चौकशी व्हावी– शाक्यमुनी बहुउद्देशीय संस्थां
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
कोचुर ता.रावेर (प्रतिनिधी)। कोचुर. बु॥ ता. रावेर ग्रामपंचायतीच्या चौदावा वित्त आयोग योजनेतील सन २०१६-१७ ते सन २०१९-२० या वर्षातील मागासवर्गीय लोकांच्या विकास कामांवर कोणत्याही प्रकारचा खर्च केलेला नसून आमच्या मागासवर्गीय लोकांना विकास कामांपासून वंचीत ठेवलेले आहे . तरी कोचुर बु॥ ग्रामपंचायतीच्या चौदावा वित्त आयोग योजनेची त्वरीत चौकशी करुन संबधीतांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील शाक्यमुनी बहुउद्देशीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी रावेर गटविकास अधिकारी पंचायत समीती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
अधिक माहिती अशी की, कोचुर बु॥ ता. रावेर ग्रामपंचायतीने आमच्या मागासवर्गीय लोकांसाठी सन २०१६-१७ ते सन २०१९-२० या वर्षातील चौदावा वित्त आयोग योजनेचा माझा गाव माझा विकास यामध्ये सन २०१६-१७ या वर्षात समाजमंदीर वॉल कंपाऊड करणे अंदाजीत रक्कम दीड लक्ष रुपये . सन २o१७-१८ मध्ये मागासवर्गीय वस्तीत सरंक्षण भिंत बांधकाम करणे दोन लक्ष अठ्ठयाण्णव हजार रुपये . सन २०१८-१९ मध्ये मागासवर्गीय विकास ( १५ )प्रमाणे गटार व भराव करणे दोन लक्ष रुपये तसेच मागासवर्गीय समाजासाठी भांडे व इतर साहित्य खरेदी करणे कामी एक लक्ष चौऱ्याहत्तर हजार सहाशे पन्नास रुपये . तर शेवटच्या सन २०१९-२० वर्षामध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये कॉक्रीटीकरण करणे दोन लक्ष रुपये व मागासवर्गीय समाज मंदीर खड्डा भराव करणेकामी बावण्ण हजार रुपये अशी माझा गाव मझा विकास या आराखड्यात विविध विकासकामे करण्याची तरतुद करण्यात आली होती. (सदरहा आराखडा दिड पटीत रकमेतकरण्यात आला होता)परंतु कोचुर बु॥ ग्रामपंचायतीने कोणतीच विकास कामे केलेली नाही व आमच्या मागासवर्गीय समाजावर अन्याय केलेला आहे.
या तक्रार अर्जाची त्वरीत चौकशी होऊन संबधीतांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शाक्यमुनी बहुऊद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कैतिक सुका मोरे. सुनिल वसंत तायडे. कीशोर डिंगबर तायडे.पिंटू पितांबर तायडे . अशोक भागवत तापडे . अरुण अर्जुन तायडे . कैलास अशोक तायडे. यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी पंचायत समिती रावेर .म. मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प जळगाव. उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जि.प जळगाव यांना देण्यात आले आहे.