भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनावर दोन महिन्यांमध्ये नियंत्रण मिळवणं शक्य- आयआयटी चा अहवाल

मुंबई (वृत्तसंस्था)। देशासह राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असतांना मुंबई आयआयटी ने लेवीट्स मेट्रिक्स सूत्रांचा वापर करून एका अहवाल सादर करतांना म्हटले आहे की, मुंबईत अवघ्या दोन आठवड्यामध्ये कोरोना संसर्गावरती नियंत्रण मिळवणं शक्य असल्याचे तसेच राज्यभरात दोन महिन्यांत तर बाकीच्या राज्यात दोन-तीन महिन्यात कोरोना नियंत्रणात आणता येऊ शकतो .

लेवीट्स मेट्रिक्स गणितीय सूत्रांचा वापर करून मुंबई आयआयटी मधील कॉम्प्युटर सायन्स चे प्राध्यापक डॉ.भास्करण रमण यांनी एक कोरोना संदर्भात आजच्या झालेल्या मृत्यू ची आकडेवारी व कालची झालेली मृत्यू ची आकडेवारी या गणितीय सूत्रांचा वापर करून देशासह राज्यात कोरोनावरील नियंत्रण बाबतीत अहवाल तयार केला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका मराठी वृत्तवहिनीला माहिती दिली, परंतु कोरोना नियंत्रणात आला म्हणजे संसर्ग पूर्णतः कमी झाला असे नाही तर कोरोना मुळे होणारे मृत्यू म्हणजे कोरोना मृत्यु दर नियंत्रणात आला असे अहवाल म्हणण्यात आले आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!