कोरोनावर प्रभावी ठरणारं ‘डेक्सामेथासोन’ औषध वापरायला आरोग्य मंत्रालयाची परवानगी
कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या उपचारपद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन औषधाने उपचार करायला परवानगी देण्यात आली आहे.
Union Health Ministry revises clinical management protocol for #COVID19. Glucocorticosteroid dexamethasone now allowed as alternative to methylprednisolone for moderate & severe #COVID19 patients in need of oxygen support who experience excessive inflammatory response: Statement pic.twitter.com/JS8YysNaNW
— ANI (@ANI) June 27, 2020
सर्वातआधी ब्रिटनमधील संशोधनात डेक्सामेथासोन औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचं निदर्शनास आलं. डेक्सामेथासोन हे औषध प्रामुख्याने संधीवात, अॅलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरलं जातं. हे औषध कोरोनावर सुद्धा प्रभावी ठरत आहे. डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. कोरोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावे, असा सल्ला WHO ने दिला होता.
WHO चे महासंचालक काय म्हणाले?
“सध्या डेक्सामेथासोन औषधासंबंधी प्राथमिक माहिती उपलब्ध आहे. हे औषध कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरत आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. आता वेगाने या औषधाचे उत्पादन वाढवून जगभरात वितरण करणं आवश्यक आहे. खासकरुन ज्या भागांमध्ये जास्त गरज आहे, तिथे हे औषध पोहोचवण्याची गरज आहे,” असं WHO चे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस म्हणाले.