कोरोना ओसरतोय; जळगांव जिल्ह्यात ६० रुग्ण पॉझिटिव्ह !
जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालात जिल्ह्यातून एकूण ६० रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. तर आजच १९३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. वृत्त दिलासा देणारे आहे.
जिल्ह्यातील आजची कोरोना आकडेवारी–
जळगाव शहर ६, जळगाव ग्रामीण ०, भुसावळ ३, अमळनेर १२, चोपडा १, पाचोरा ०, भडगाव ४, धरणगाव १, यावल ३, एरंडोल ०, जामनेर १२, रावेर ६, पारोळा ४, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर ३, बोदवड १, इतर जिल्हातील ० असे एकुण ६० रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकुण ५१८८९ कोरोना रूग्ण आढळून आले असून ४८७६६ रूग्ण कोरोनावर मात करत घरी परतले आहे. तर आज ३ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण १२४१ रूग्ण मृत्यू पावले आहे. तर जिल्ह्यात आता १८८२ रूग्ण उपचार घेत आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरीचा रेट हा ९३.९८ टक्क्यांपर्यंत आला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.