कोरोना बाधित मयत पोलीस पाटील वारसाला 50 लाख मदत मिळणेची खानदेश पोलीस पाटील विभाग संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांची मागणी !
सुरेश पाटील
यावल (प्रतिनिधी)। यावल येथील पोलीस पाटील तथा कोरोना योद्धा म्हणून असलेले मिलिंद गजरे यांना शासकीय काम करताना कोरोना विषाणूची बाधा झाल्याने औषधोपचार सुरू असता त्यांचे निधन झाले आहे तरी त्यांच्या वारसांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळण्याची मागणी खान्देश पोलीस पाटील संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह यावल तालुका पोलीस पाटील संघटने मार्फत करण्यात आली आहे.
खान्देश पोलीस पाटील संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, यावल तालुका पोलीस पाटील संघटनेतील पदाधिकारी पवन चौधरी (अट्रावल ), सुरेश पाटील (पाडळसे ), दिलीप पाटील ( सांगवी ), नरेश पाटील ( मारूळ ), दीपक पाटील (कोळवद ) यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील यांनी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांची भेट घेऊन यावल शहरात अखंड 30 वर्ष पोलीस पाटील म्हणून यशस्वी रित्या सेवा केलेले तसेच कोरोना योद्धा म्हणून काम करताना मिलिंद गजरे यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याने औषध उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या वारसास शासनाकडून 50 लाख रुपयांची मदत मिळणेची मागणी खानदेश विभाग पोलीस पाटील संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन तसेच यावल तालुका पोलिस पाटील संघटनेचे तर्फे करण्यात आली आहे.