भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी काढला पळ; २ दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्येच पडून

मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।

मुंबई ( प्रतिनिधी )– कोरोना संक्रमणाची दुसरी लाट नियंत्रणाच्या बाहेर जाताना दिसत आहे. संक्रमणासोबतच मृत्यूचा आकडाही वाढत आहे.कोरोना संक्रमणामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना संक्रमित व्यक्तीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.

झारखंडमध्येही कोरोना संक्रमण धोकादायक बनलं असताना येथील दुमका मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये कोरोना संक्रमित रुग्णाचा मृतदेह २ दिवस पडून होता. कोरोना संक्रमणाने मृत्यू झाल्याचं समजताच मृतदेहाच्या नातेवाईकांनी याठिकाणाहून पळ काढला. २ दिवस हा मृतदेह पडून राहिल्याने इतर रुग्णांना गोंधळ घातला त्यानंतर हा मृतदेह पोस्टमोर्टम विभागात ठेवण्यात आला.

कोरोना संक्रमणामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना संक्रमित व्यक्तीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यातही कोणी नातेवाईक तयार नाहीत. हाच प्रकार दुमका येथे घडला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह सोडून नातेवाईकांनी तेथून पळ काढला त्यामुळे मृतदेह २ दिवस हॉस्पिटलमध्येच बेवारस अवस्थेत पडला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, झरखंड मधील दुमका येथे एका रुग्णाला घेऊन त्याचे कुटुंबीय डीएमसी हॉस्पिटलमध्ये आले होते. जोपर्यंत डॉक्टर या रुग्णाला तपासण्यासाठी येत नाही तोवर त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी हळूहळू हॉस्पिटलमधून काढता पाय घेतला. हा रुग्ण खुर्चीत बसून कोणतीही हालचाल करत नव्हता तेव्हा इतर रुग्णांनी प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर डॉक्टरांनी तपासलं असता त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळालं.
कोरोना चाचणीनंतर रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर या व्यक्तीचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅगेत पॅक करून हॉस्पिटलच्या परिसरात ठेवण्यात आला. २ दिवस हा मृतदेह तिथेच पडून होता. त्यानंतर इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला तेव्हा हा मृतदेह पोस्टमोर्टम विभागात ठेवण्यात आला. या रुग्णाच्या नातेवाईकांची माहिती नसल्याचं हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. त्यानंतर आता प्रशासनाने स्थानिक अधिकाऱ्यांना पत्र लिहून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेला विनंती केली आहे. कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला हात लावण्यासाठी सगळे घाबरतात, त्यामुळे नातेवाईक पळून गेले. त्यानंतर १० एप्रिल रोजी नगर परिषदेच्या टीमने या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!