कोरोना संदर्भात रावेर तालुक्यात पोलीस पाटीलांची बैठक !
रावेर (प्रतिनिधी) । जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे लक्षात घेता आज रावेर पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये रावेर तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठकीचे संपन्न झाली.
पोलीस पाटीलांच्या मिटिंग मध्ये गावातील लग्न समारंभास ५० व्यक्तीच्या उपस्तीत तर मयत यात्रा २० व्यक्तीस कार्यक्रम, सण उत्सव परवानगी , तर गावात येणारे नविन व्यक्ती व तसेच कंटेन्टमेंट झोनमध्ये येणारे किंवा जाणार नाही याबाबत सुचना देण्यात आल्या असुन रावेर शहरातील बॅक व एटीएम केंद्राचे सेन्टरचे सुरक्षे संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विविध सूचना देण्यात आल्या. बैठकीत संबधित बॅक मॅनेजर व आदी उपस्थित होते.