कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रावेरात सात दिवसाचा जनता कर्फ्यू !
रावेर (प्रतिनिधी): शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी सात दिवसाचा जनता कर्फ्यु लावण्याचे प्रशासनाला मागणी केली असता, रविवार पासून कडक ‘जनता कर्फ्यु’ पाळण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.
येथील तहसील कार्यालयात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची पालिकेच्या नगरसेवकांनी भेट घेतली. यावेळी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना होत असताना, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने गर्दीला आटोक्यात आणून कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी बुधवारी महत्वपूर्ण चर्चा झाली.
यात सोमवार दि.१४ पासून शनिवार दि १९ जुलै पर्यन्त ‘जनता कर्फ्यु’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रसंगी पालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे अधिकारी उपस्थित होते. तर उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन, गटनेते असिफ मोहंमद, ॲड.सुरज चौधरी, यशवंत दलाल, असदुल्ला खा.शारदा चौधरी, कलीम मेंबर, आयुबखा पठाण यांनी नगरसेवकांच्या सहया असलेले निवेदन दिले. त्यानुसार जनता कर्फ्यु पाळण्यासाठी प्रशासना कडून हिरवा कंदील मिळाला आहे.