कोरोना संसर्ग वाढतोय; सावद्यात पुन्हा एक महिला व कॉन्ट्रॅक्ट बेस वरील तीन नगरपालिका कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना बाधित !
सावदा (प्रतिनिधी)। शहरात कोरोना संसर्ग पुन्हा प्रभाव दाखवत असल्याचे दिसून येत आहे. आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात शहरातील चार व्यक्तीच्या तपासणी अहवाल बाधित आढळून आल्याने निष्पन्न झाले आहे.
शहरातील आज आलेल्या तपासणी ४ अहवाल बाधित आले आहेत, त्यात १ महिला व तीन कॉन्ट्रॅक्ट बेस वरील नगरपालिका कर्मचारी यांचा समावेश असून संसर्ग वाढीस लागल्याचे दिसत आहे. सदरील महिला ओम कॉलनी परिसरातील रहिवासी आहे. सदरील परिसर प्रशासनाकडून आधीच सील करण्यात आला असुन, वृत्तास नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या ८० झाली असुन त्यात १० मयत तर १८ उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला हरवत घरी परतले आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.