भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

खान्देशात जळगांव जिल्‍ह्‍यातील यावल तालुक्‍यामधील (मनुदेवीचे) आडगांव येथील शिक्षकाचे लघुचित्रपट निर्मितीक्षेत्रात गरूड झेप..!

यावल (सुरेश पाटील)। संपूर्ण मानव जातीच सुख किंवा दु:ख हे त्‍याने वैयक्‍तीकपणे धारण केलेल्‍या विचारांवर ,संस्‍कारावर अवलंबुन असते.आणि हे संस्‍कार सात्‍विक ग्रंथांवर अवलंबून असते. व याच ग्रंथांची भाषा पौराणिक, ऐतिहासिक, आदिकाळापासुन देवी, देवतांची संस्‍कृतभाषा म्‍हणुन सर्वांनाच ज्ञात आहे.

म्‍हणुन भारतातील साधु-संतांची सात्त्विक विचारधारा टिकुन राहावी व नव्‍या पिढीला सुसंस्‍कार प्राप्‍त व्‍हावेत याकरिता आजच्‍या काळात मृतस्‍वरुपवत पावलेल्‍या संस्‍कृत भाषेचा प्रचार हेतू “अम्‍बाली” या स्‍त्रीप्रधान असलेल्‍या सामाजिक,कौटुंबिक विषयाधारावर संस्‍कृत लघुचित्रपट निर्मित करण्‍याच धाडस खान्देच्‍या इतिहासात प्रथमच जळगांव जिल्‍ह्‍यातील यावल तालुक्‍यामधील (मनुदेवीचे ) आडगांव येथील बाबुलाल पाटील या युवा पिढीतील शिक्षकाने केले आहे.”अम्‍बाली” या संस्‍कृत चित्रपटाचे (शुटींगकार्य) चित्रिकरण फेब्रुवारी महिन्‍यातच यावल व रावेर तालुक्‍यात आदी लोकेशनवर झाले असुन लवकरच तांत्रिक त्रुटी पूर्ण झाल्‍यावर “अम्‍बाली ‘ प्रेक्षकांच्‍या मनोरंनासाठी प्रदर्शित होण्‍याच्‍या मार्गावर आहे.यावल तालुक्‍यातील आडगाव येथील रहिवासी बाबुलाल पाटील हे पत्रकार देखील आहेत.तसेच त्‍यांनी पुणे येथील फर्ग्‍युसन काॅलेज मध्ये संस्‍कृत व इंग्रजी विषयात बी.ए.(Graduate) शिक्षण पूर्ण करुन अॅक्‍टींग (अभिनय) कोर्स देखील पूर्ण केला आहे.त्‍यामुळे 2007 मध्‍ये त्‍यांनी “भूक” नावाच्‍या मराठी चित्रपटात हिरो म्‍हणुन मुख्‍य कलाकार पात्राची भूमिका केली आहे.परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तद्‍नंतर बाबुलाल पाटील यांनी काहीकाळ आॅर्केष्‍ट्रात फिल्‍मी कलाकार अमरिश पुरी, दादा कोंडके आदीहिरोंच्‍या आवाजाची नककल व कुमार सानु,विनोद राठोड,महेन्द्र कपूर,एस.पी.बालसुब्रमण्‍यम आदी गायकांच्‍या आवाजांत गाणी गाऊन श्रोत्‍यांचे मनोरंजन करित असत व त्‍यातुन मिळणार्‍या तुटपुंज्या ‍या पैशांतुन आर्थिक अडचण दूर करित असत. मध्‍यंतरी पुण्‍यात देहु-आळंदीला राहुन वारकरी संप्रदायाचे कीर्तन व संत साहित्‍याचा देखील अभ्‍यास त्‍यांनी केला आहे.त्‍यामुळे वेळप्रसंगी कीर्तन करित असल्‍याने खान्देशात त्‍यांची ह.भ.प.बाबुलाल महाराज म्‍हणुन ओळख आहे.बाबुलाल पाटील यांनी शैक्षणिक, धार्मिक व अभिनय क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर 2010 मध्‍ये पुन्‍हा खांदेशात वापसी झाली.त्‍यांनी 2010 ते 2020 मधील काळात खांन्देशात संस्‍कृत व इंग्रजी विषयाचे अध्‍यापन सेवा (संस्‍कृत शिक्षक म्‍हणुन) आणि वेळप्रसंगी किर्तनांची सेवा करित आहे .महाराष्‍ट्रासह खान्देशातील कलाकार मंडळींनी पुन्हा चित्रपट कलाक्षेत्रात पदार्पण करावे म्‍हणुन आग्राहाने प्रेरित झाल्‍याने बाबुलाल पाटील यांनी दहा वर्षात विविध भाषेत एकुण 80 चित्रपट कथांचे लेखनकार्य पूर्ण केले आहे. त्‍यातुनच 2020 मध्ये “अम्‍बाली” संस्‍कृत चित्रपट निर्मितीचे व दिग्दर्शनाचे कार्ये प्रथमच हाती घेतले आहे. परंतु बाबुलाल पाटील यांची आर्थिक परिस्‍थिती पुरेसी नसल्‍याने या चित्रपटाला लागणारे आर्थिक सहकार्य त्‍यांच्‍या संस्‍कृत प्रेमी,ज्ञानी,वारकरी गुरुजन, आप्‍तेष्‍ट, शिक्षक मित्र परिवार व महाराज मंडळींनी केले आहे.

या चित्रपटातील मुख्‍य कलाकार म्‍हणुन स्‍वतः बाबुलाल पाटील सह श्रेया कुलकर्णी ,अपूर्वा पाटील,राजश्री मनोहर, भारती चौधरी,तिलोत्‍तमा चौधरी,माधुरी वसाने,मयूर कोळी,खिलेश साळुंके,आशिष बोरोले,विलास चौधरी आणि किरण वसाने आदी कलाकारांनी भूमिका केल्‍या आहेत.बाबुलाल पाटील यांनी “अम्‍बाली” संस्‍कृत लघुचित्रपट मधुन सामाजिक विषयावर भर देतांना महाराष्‍ट्राच्‍या तूलनेत उत्‍तर भारतात संस्‍कृतभाषेत चित्रपट निर्मितीचे प्रमाण अधिक आहे,मात्र महाराष्‍ट्र संताची भूमी असून राज्‍यातील जनता संस्‍कृत भाषापासुन दूरावत चालल्‍याची खंत वाटत असल्‍याचे सांगीतले.बाबुलाल पाटील यांच्‍याकडे मराठी चित्रपट “आई मनुदेवीच्‍या नावाने चांगभल” व “लवकैदी” तसेच अहिराणी चित्रपट “खांदेशना पांडव” असे तीन मोठे बीग बजेट चित्रपटांचे निर्मिती व दिग्दर्शनाचे कार्य लवकरच लाॅकडाऊन काळ संपल्‍यावर हाती घेणार आहेत.असे बाबुलाल पाटील यांनी खांदेशाच्‍या इतिहासात प्रथमच संस्‍कृतभाषेत निर्माण झालेल्‍या “अम्‍बाली ” चित्रपटाच्‍या रिलीजींगच्‍या पार्श्‍वभूमीवर मत मांडले असुन प्रेक्षकांना आता ” अम्‍बाली”लवकरच पाहायला मिळणार आहे म्‍हणुन जनतेकडुन देखील चित्रपटाला उत्‍तम प्रतिसाद मिळण्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!