भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिरोद्यात कोरोनाचा पहिला रुग्ण बाधित !

खिरोदा ता.रावेर। आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात खिरोदा गावातील 82 वर्षीय वृद्ध महिलेला 5 दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे  फैजपुर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सदरील रुग्णांचे स्लॅब घेतले असता अहवाल बाधित आढळून आल्याचे निष्पन्न झाले असून सदरील रुग्ण गांधी पुतळा, तराई रस्ता परिसराती रहिवासी असुन रुग्णांच्या संपर्कातील 10 व्यक्तींना कॉरंटाइन करण्यात येत असुन सदरील परिसर प्रशासनाकडून सिल करण्यात आला आहे. गावात आधी कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नव्हता आता इथे पण शिरकाव झाला असून गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. सदरील वृत्तास ग्रामपंचायत प्रशासनाने दुजोरा दिला आहे

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!