रावेरसामाजिक

खिर्डी ऐनपुर रोड वरील अपघात ग्रस्त खड्डा बुजविण्याची मागणी.

खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। खिर्डी ते ऐनपूर रस्त्यावर चिंच फाट्या जवळच अगदी रस्त्याच्या मधोमध काही महिन्यांपासून लांब खड्डा पडलेला असून सदर ठिकाणी छोटे – मोठे अपघात घडत असतात व्यापारी, शेतकरी,मजूर वर्ग, वाहन धारकांची नेहमीच या रस्त्यावरून वर्दळ सुरूच असते. संबधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आल्याने पदाचारी व वाहन धारकामध्ये नाराजी पसरली असून या रस्त्यावर अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत असल्याने या कडे बांधकाम विभागाने लक्ष देवून रस्त्यातील खड्डा तात्काळ बुजविण्यात यावा. व नव्याने सुरू होणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या कामाचा देखभाल दुरुस्ती करिता माहिती फलक लावणे गरजेचे आहे मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते तथा पत्रकार भिमराव कोचुरे यांनी केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!